Breaking

अंबाजोगाई-अहमदपूर हायवेवर भीषण अपघात; लातूरच्या २२ वर्षीय तरुण चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Updated: जून 15, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई-अहमदपूर हायवेवर भीषण अपघात; लातूरच्या २२ वर्षीय तरुण चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई ते अहमदपूर महामार्गावरील खापरटोन शिवारात राम हॉटेलजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना २ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी १४ जून रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन शंकर कराड (वय २२, रा. चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत जीवन कराड हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल (क्रमांक MH24CE2256) घेऊन महामार्गावरून जात असताना, खापरटोन शिवारात त्याचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने मोटरसायकल थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्यात जाऊन कोसळली. या भीषण अपघातात जीवनच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याने मयत चालक स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मयताचे वडील शंकर गोविंद कराड यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस अंमलदार राठोड पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts