Breaking

चाकूचा धाक दाखवून दांपत्याला लुटले; धारूरच्या दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल

Updated: जून 15, 2026

By Vivek Sindhu

चाकूचा धाक दाखवून दांपत्याला लुटले; धारूरच्या दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: तालुक्यातील पिसेगाव फाटा येथे चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून एका शेतकरी दांपत्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १३ जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी १४ जून रोजी सकाळी केज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिसेगाव येथील रहिवासी धनराज नामदेव सूर्यवंशी (वय ३०) हे आपल्या पत्नीसह केज येथील सासरच्या घरी जेवण करून रात्री मोटारसायकलने गावी परतत होते. पिसेगाव फाट्यावरून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या १०० मीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरील चार जणांनी सूर्यवंशी यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी धनराज आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी धनराज यांच्या खिशातील रोख २ हजार रुपये आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला. पीडित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसांनी शेषेराव हिम्मत शिंदे (रा. मोहा, ता. कळंब), भीमा आबा काळे (रा. दत्तनगर, धाराशिव) आणि इतर दोन अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९ (४) व (६) अन्वये गुन्हा नोंदवला असून सहाय्यक फौजदार सानप पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts