Breaking

गावच्या राजकारणा वरून एकमेकात झाली स्मशानभूमीतच हाणामारी

Updated: जून 13, 2026

By Vivek Sindhu

गावच्या राजकारणा वरून एकमेकात झाली स्मशानभूमीतच हाणामारी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- गावच्या राजकारणाच्या गप्पा सुरू असताना एकाला राग अनावर झाल्याने एकाने दुसऱ्याला चापट बुक्क्यांनी आणि लाकडाने मारहाण केली आहे.

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे दि. १० जून रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास हेमंत श्रीपती घोडके हे गावा लगत असलेल्या स्मशानभूमी शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाच्या सावलीला बसले होते. त्यावेळी त्यांच्या गावातील तुकाराम दादाराव गालफाडे हे तिथे आले. त्यांच्यात गावातील राजकारणाच्या गप्पा सुरू असताना तुकाराम गालफाडे यांना राग आल्याने त्यांनी हेमंत घोडके यास शिवीगाळ केली. हेमंत याने त्यांना शिवीगाळ करू नको म्हणताच, त्याने हेमंत या चापट बुक्क्यांनी मारहाण करून लाकडाने हातावर आणि पायावर मारहाण केली. यात हेमंत याच्या पायाच्या नडगीला आणि हाताच्या करंगळीला जखम झाली आहे.

हेमंत घोडके यांनी दिलेल्या तक्रारी वरून तुकाराम घोडके याच्या विरुद्ध गु. र. नं. ३६८/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts