Breaking

बीडची हिंदवी चौरे ठरली पहिल्या योगासन चॅम्पियनशिपची दोन सुवर्ण पदक विजेती

Updated: जून 12, 2026

By Vivek Sindhu

बीडची हिंदवी चौरे ठरली पहिल्या योगासन चॅम्पियनशिपची दोन सुवर्ण पदक विजेती

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिवाचीवाडीच्या हिंदवी चौरेने वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये पटकावले दोन सुवर्ण पदके

केज :- जागतिक स्तरावर गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या योगासन स्पर्धेचे दोन सुवर्ण पदके बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी ता. केज येथील हिंदवी परमेश्वर चौरे हिने ‘वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप’ मध्ये दोन सुवर्ण पदके पटकावून जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे. 

भारतात प्राचीन परंपरांमध्ये रुजलेल्या योगाचे जागतिक केंद्र म्हणून भारताची ओळख आहे. सन २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगासनाला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये समावेश होण्या करिता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली योगासन भारत यांच्या वतीने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे जागतिक योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंदवी चौरे हिने दुहेरी सुवर्णपदक पटकावले. हिंदवीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कठोर परिश्रम घेऊन योगासनामध्ये नैपुण्य मिळवले आहे. तिने जागतिक पातळीवर आपल्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले. तिच्या या यशाने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून तिचे आमदार नमिता मुंदडा यांनी अभिनंदन कौतुक केले. तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. 

——-

हिंदवीने मिळवलेले हे यश केज मतदार संघासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. केजच्या मातीतील एका मुलीने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकवला, ही आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. हिंदवीची ही यशोगाथा मतदार संघातील आणि देशातील असंख्य युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल. तिला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 

— आ. नमिता मुंदडा

विधानसभा सदस्य, केज


Categories

Recent Posts