Breaking

शेतीतील नुकसानीचा जाब विचारल्याने वृद्धाला दगडाने बेदम मारहाण; जायकोवाडी तांड्यावरील घटना

Updated: जून 6, 2026

By Vivek Sindhu

शेतीतील नुकसानीचा जाब विचारल्याने वृद्धाला दगडाने बेदम मारहाण; जायकोवाडी तांड्यावरील घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जायकोवाडी तांडा येथे शेतजमिनीच्या नुकसानीचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ६८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ५ जून २०२६ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानकीराम सोमा राठोड (वय ६८, रा. जायकोवाडी तांडा) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी जानकीराम राठोड आणि आरोपी एकाच गावचे रहिवासी असून त्यांची शेती शेजारी-शेजारी आहे. दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी जानकीराम यांच्या शेतातून उसाचे ट्रॅक्टर नेल्याने त्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. याच नुकसानीचा जाब फिर्यादीने विचारला असता, शेजारी राहणारे आरोपी एकनाथ आनंद राठोड आणि मुक्ताबाई एकनाथ राठोड यांनी संगणमत करून वाद घालण्यास सुरुवात केली. एकनाथ राठोड याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत फिर्यादीला पाठीमागून ढकलून दिले आणि हातातील दगडाने त्यांच्या नाकावर, छातीवर व पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच मुक्ताबाई राठोड हिने फिर्यादीच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि चापटमारून बेदम मारहाण केली. तुम्हाला गावात राहू देणार नाही अशी धमकीही आरोपींनी दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस अंमलदार वखरे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts