Breaking
Updated: जून 6, 2026
विहिरीच्या पाण्यावरून वाद; घरात घुसून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेरी (खुर्द) येथे विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याच्या घरात घुसून जबर मारहाण करण्यात आली. आरोपींनी घरातून ५० हजार रुपयांची रोकड आणि ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १ जून २०२६ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, ५ जून रोजी पहाटे याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश महादेव महाडीक (वय ४०, रा. शेरी खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेषेराव उर्फ शेषा उर्फ कोच्या देशा चव्हाण आणि प्रियंका शेषेराव चव्हाण या दोघांनी संगणमत करून ही कृत्य केले. विहिरीचे पाणी भरण्याच्या शुल्लक कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना प्रथम अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर थेट घरात घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची नगदी रोकड आणि फिर्यादीच्या पत्नीचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. जाताना आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस अंमलदार आहेर पुढील तपास करत आहेत.