Breaking
Updated: जून 6, 2026
रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावासह तिघांची कोयत्याने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशिरूर कासार: तालुक्यातील हिवरसिंगा येथे शेतातील दगड काढण्याच्या किरकोळ वादावरून एका शेतकाऱ्याला आणि त्यांच्या सहकाऱ्याला कुऱ्हाडीच्या तुंब्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ५ जून २०२६ रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी घडली. या प्रकरणी लिंबा (खांबा) येथील राजाभाऊ एकनाथ नागरगोजे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून काशीनाथ हरीभाऊ धांडे, रामेश्वर काशीनाथ धांडे, महेश रामेश्वर धांडे, मणिषा काशीनाथ धांडे आणि कुसुम रामेश्वर धांडे यांच्याविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रसार विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नागरगोजे हे शेतात वेढा करण्यासाठी गेले असता त्यांनी आरोपींना शेतातील दगड काढून घेण्यास सांगितले. याच कारणावरून आरोपींनी वाद घालत नागरगोजे आणि अभिमान शिरोळे यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उबाळे करत आहेत.