Breaking

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Updated: जून 3, 2026

By Vivek Sindhu

World Suicide Day

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रक्ताच्या डागांनी माखलेल्या पानावर लिहिली सुसाईड नोट

बीड: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने विश्वासघात केल्यामुळे नैराश्यातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय शाळकरी मुलीचे बोरफडी गावातील अंकुश शेरु ऊर्फ श्रीमंत घुगे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अंकुशने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार देत दोघांचे फोटो लोकांना दाखवण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासाला कंटाळून पिडीतेने १९ एप्रिल २०२६ रोजी राहत्या घरी विष प्राशन केले. तिला उपचारासाठी बीड आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे २४ एप्रिल रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अंत्यविधीनंतर पिडीत बालिकेच्या शाळेच्या वहीत एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये अंकुशने फसवणूक केल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचा उल्लेख तिने रक्ताच्या डागांनी माखलेल्या पानावर केला होता. या चिठ्ठीच्या आधारे मृत मुलीच्या वडिलांनी २ जून २०२६ रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अंकुश घुगेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्माकर आहेर करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts