Breaking

श्री.योगेश्वरी मंदिरात ‘ज्ञानप्रसादालय’ ग्रंथालयाचे उद्घाटन

Updated: मे 26, 2026

By Vivek Sindhu

रोटरी क्लब व श्री.योगेश्वरी देवल कमिटी यांचा उपक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रोटरी क्लब व श्री.योगेश्वरी देवल कमिटी यांचा उपक्रम

अंबाजोगाई- :”बुके नको, पुस्तक द्या” या अभिनव संकल्पनेतून अंबाजोगाईत साकारलेल्या ‘ज्ञानप्रसादालय’ या ग्रंथालयाचे उद्घाटन शनिवारी श्री योगेश्वरी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अंबाजोगाई पुस्तकांचं गावं या उपक्रमात
सहभाग नोंदवत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व श्री. योगेश्वरी देवल कमेटी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे होते.तर उद्घाटक म्हणून देवल कमिटीचे सचिव गिरधारीलालजी भराडिया, रोटरीचे उपप्रांतपाल प्रवीण देशपांडे, प्रांतसचिव डॉ. राजगोपाल तापडिया,
देवल कमिटीचे विश्वस्त कमलाकर चौसाळकर,उल्हास पांडे, हंसराज देशमुख, प्रवीण दामा, पूजा कुलकर्णी,गौरी जोशी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक,सचिव मंजुषा जोशी, प्रकल्प प्रमुख अविनाश मुडेगावकर, सहप्रकल्प प्रमुख धनराज सोळंकी,सौ. संगीता लातुरे, शर्मिष्ठा देशपांडे, मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरधारीलाल भराडिया म्हणाले की मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद व ज्ञानप्रसाद या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. हे ग्रंथालय सुसज्ज व अत्याधुनिक करून भक्तांना इथे अंबाजोगाईच्या इतरही पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे.
आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना सुधीर लातुरे म्हणाले की वाचन संस्कृती टिकली तरच खऱ्या अर्थाने प्रगतीची दिशा साध्य होईल. हा मंदिरात सुरू झालेला उपक्रम प्रेरणादाई असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रवीण देशपांडे, प्रा. रोहिणी पाठक,यांनी मनोगत व्यक्त केले.

दीपप्रज्वलन व फित कापून ‘ज्ञानप्रसादालय’ या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अविनाश मुडेगावकर यांनी केले. संचलन सुरेखा काळे, शिल्पा सेलुकर यांनी तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुकेऐवजी पुस्तकांच्या भेटीतून साकारले ज्ञानप्रसादालय :

पत्रकार अविनाश मुडेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पुढाकाराने वाढदिवसा निमित्त बुके नको बुक द्या. या राबवलेल्या उपक्रमातून १ हजार पुस्तके जमा झाली होती. या ग्रंथसंपदेचे रूपांतर आता ज्ञानप्रसादालयात झाले आहे.


Categories

Recent Posts