Breaking

कपडे वाळत घालण्याच्या दोरीवरून रेल्वे डोक्यात विळा मारला 

Updated: मे 21, 2026

By Vivek Sindhu

कपडे वाळत घालण्याच्या दोरीवरून रेल्वे डोक्यात विळा मारला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- केज तालुक्यातील कोरेगाव येथे कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या दोऱ्या सोडल्याच्या कारणा वरून गोवा येथे रेल्वे विभागात ऑपरेटर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात विळा मारून चापट-बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

कोरेगाव ता. केज येथील श्रीराम भारत मुंडे वय (२९ वर्ष) हे गोव्यातील वेरणा रेल्वे स्टेशन येथे इलेक्ट्रीक इंजीनियर डिपार्टमेंटमध्ये प्रोफाईल ऑपरेटर म्हणून नोकरीस आहे. सुट्टी निमित्त ते कोरेगाव येथे गावाकडे आले होते. १० मे रोजी दुपारी २:०० वाजता सुट्टी संपल्याने ते परत कर्तव्यावर निघाले असता त्यांचे शेजारी दत्तात्रय किसन मुंडे यांनी घराचे समोर रस्त्यावर कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या होत्या. त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या डोक्याला लागत असल्याने, गाडीवरुन पडु नये म्हणुन श्रीराम मुंडे यांनी त्या सोडल्या. त्या वरून दत्तात्रय किसन मुंडे व सुरज दत्तात्रय मुंडे या दोघांनी रेल्वे कर्मचारी श्रीराम मुंडे यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ करीत डोक्यात विळा मारून जखमी केले. तसेच चापट-बुक्क्याने मारहाण करीत मुक्कामार दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. 

श्रीराम मुंडे यांच्या तक्रारी वरून दत्तात्रय मुंडे, सूरज मुंडे या दोघा बाप-लेका विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संगीता हनवते या तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts