Breaking

दोन विवाहित महिलांचा सासरी छळ ; पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल 

Updated: मे 21, 2026

By Vivek Sindhu

दोन विवाहित महिलांचा सासरी छळ ; पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :- कार घेण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन येत नसल्याचे कारणा वरून एका ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घरा बाहेर हाकलून दिल्याची घटना तेरखेडा (ता. वाशी) येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत एका २७ वर्षीय विवाहितेचा कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्या वरून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना आढाळा (ता. कळंब) येथे घडली. या दोन्ही घटनेबद्दल पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

केज शहरातील फुलेनगर माहेर असलेल्या प्रतिमा प्रवीण उर्फ बबलू सरवदे (वय ३०) या विवाहितेचा २०१६ मध्ये तेरखेडा (ता. कळंब) येथील प्रवीण बाबासाहेब सरवदे सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर दोन मुली झाल्या. त्यानंतर तुझ्या आईवडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून कार घेण्यासाठी २० लाख रुपये आणण्यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी तगादा लावला. प्रतिमा सरवदे हिने आईवडिलांची  परिस्थिती नसल्याने तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्याने तु येथे राहु नकोस. तु जर येथे राहिली तर तुझा काटाच काढुत असे म्हणत जिवे मारण्याच्या धमक्या देऊन घराबाहेर हकलून दिले. अशी तक्रार प्रतिमा सरवदे यांनी दिल्यावरून पती प्रवीण सरवदे, चुलत सासरे सुहास सरवदे, चुलत सासू सिमा सरवदे, चुलत दिर संस्कार सरवदे, चुलत नंणद सायली सरवदे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

      दुसऱ्या घटनेत वाघेबाभूळगाव (ता. केज) माहेर असलेल्या प्रतिभा शशिकांत खंडागळे (वय २७) हिचा २०२४ मध्ये आढाळा (ता. कळंब) येथील शशीकांत बापुराव खंडागळे याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. कर्ज फेडण्यासाठी आई वडिलांना पैसे आणण्यासाठी तगादा लावून चारित्र्यावर संशय घेत पती, सासू, सासऱ्याने शारीरिक व मानसिक छळ करीत दुसरे लग्न करायचे आहे, आमची मुलगी आम्हाला दे म्हणत नसता तुझ्या माहेरी येऊन आत्महत्या करण्याची धमकी पती शशिकांत खंडागळे याने दिली. अशी तक्रार प्रतिभा खंडागळे यांनी दिल्यावरून पती शशिकांत खंडागळे, सासू कौशल्या खंडागळे, सासरे बापुराव खंडागळे या तिघां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts