Breaking
Updated: मे 12, 2026
मकोकातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – शहरातील जालना रोडवरील एका बियर शॉपीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून रविवार (दि.११) रात्री ११ च्या सुमारास मकोका अंतर्गत मागील एक वर्षांपासून फरार आरोपी आशिष आठवले याने बियर शॉपी मालकावर गोळीबार केला. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करत बेड्या ठोकल्या.
घटनेची माहिती मिळताच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी आशिष आठवलेला सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपीला पकडताना पोलिस व आरोपीमध्ये काही काळ झटापट झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
बीड शहरात पुन्हा गोळीबारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी काही तासांतच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी शिवाजी बंटेवाड, शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,पोउनि श्रीराम खटावकर, पोह अशोक दुबाळे, राहुल शिंदे, सोमनाथ गायकवाड, मनोज परजणे, अशफाक सय्यद, शहेनशहा सय्यद,इलियास शेख,नितीन वडमारे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.