Breaking
Updated: मे 4, 2026
ॲड. अशोक कवडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागांवर वर्चस्व
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील जिल्हा न्यायालय वकील संघाच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक निवडणुकीत ॲड. अशोक बाळासाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखालील ‘वकील संघ एकता पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत सर्वच्या सर्व जागांवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सोमवारी ४ मे रोजी पार पडलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी ‘स्वाभिमानी पॅनेल’चा पूर्णतः पराभव झाला असून एकता पॅनेलने ‘क्लिन स्वीप’ देत सर्व सातही पदांवर विजय मिळवला आहे. सकाळपासून न्यायालय परिसरात सुरू असलेल्या मतदानानंतर सायंकाळी निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आणि वकिलांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. अशोक बाळासाहेब कवडे यांनी बाजी मारली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पॅनेल निवडून आले आहे. यामध्ये पुरुष उपाध्यक्ष म्हणून ॲड. मीर फारुकअली उस्मानी, महिला उपाध्यक्ष म्हणून ॲड. मनिषा मोतीराम रुपनर, सचिव पदी ॲड. राजकुमार शेषेराव चौरे, सहसचिव पदी ॲड. स्नेहल संजय नागरगोजे, कोषाध्यक्ष पदी ॲड. अक्षय राजेश कांबळे आणि ग्रंथपाल म्हणून ॲड. प्रवीण गजानन पेडगावकर यांची निवड झाली आहे. अंबाजोगाई वकील संघाच्या हितासाठी आणि वकिलांच्या अस्मितेसाठी हा लढा असल्याचे एकता पॅनेलने आपल्या प्रचारात म्हटले होते, ज्याला मतदारांनी भरघोस कौल दिला आहे.
सोमवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत वकिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. वकिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि बार असोसिएशनच्या विकासासाठी हे नवीन कार्यकारिणी मंडळ आगामी काळात कार्य करणार आहे. या विजयामुळे वकील वर्तुळातून एकता पॅनेलच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उमेदवारांना मिळालेली मते:
आजचा निवडणूक निकाल
१) अध्यक्ष
ऍड अशोक कवडे- २६४
ऍड कल्याणी विर्धे- १३०
ऍड महादेव मुदगलकर-८
ऍड विशाल घोबाळे-३
ऍड पद्मा कुपकर-१
बाद मतदान-२
ऍड अशोक कवडे १३४ मतांनी विजयी
२) उपाध्यक्ष
ऍड फारुख उस्मानी-२१९
ऍड कैलास चामणर-१८३
बाद मतदान-७
ऍड फारुख उस्मानी ३७ मतांनी विजयी
३) उपाध्यक्ष (महिला)
ऍड मनीषा रुपनर-२१४
ऍड अमिता साळवे-१८६
बाद मतदान-८
ऍड मनीषा रुपनर २८ मतांनी विजयी
४) सचिव
ऍड राजकुमार चौरे-१५३
ऍड पृथ्वीराज कदम-१५०
ऍड हनुमंत अकाते-१०२
बाद मतदान-३
गहाळ मतपत्रिका-२
ऍड राजकुमार चौरे-०३ मतांनी विजयी
५) सहसचिव (महिला)
ऍड स्नेहल नागरगोजे-२५२
ऍड छाया देहरे-१४८
बाद मतदान-७
गहाळ मतपत्रिका-१
ऍड स्नेहल नागरगोजे ११४ मतांनी विजयी
६) ग्रंथपाल
ऍड प्रवीण पेडगावकर-२३८
ऍड चंद्रकांत मुंडे-१६३
बाद मतदान-३
गहाळ मतपत्रिका-४
ऍड प्रवीण पेडगावकर ७५ मतांनी विजयी
६) कोषाध्यक्ष
ऍड अक्षय कामळे-२४४
ऍड खमर शेख-१५७
बाद मतदान-६
गहाळ मतपत्रिका-१
ऍड अक्षय कामळे ८७ मतांनी विजयी