Breaking
Updated: एप्रिल 28, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: डोमिनोज पिझ्झाची शाखा देण्याचे आमिष दाखवून माजलगाव येथील एका तरुण व्यापाऱ्याला तब्बल २६ लाख ९५ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमर आनंद डाके (वय २०, रा. बँक कॉलनी, माजलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ एप्रिल ते २१ एप्रिल २०२६ दरम्यान हा प्रकार घडला. अज्ञात आरोपींनी एका बनावट ईमेल आयडीवरून आणि दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अमर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना डोमिनोज पिझ्झाची फ्रँचायझी देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली आरोपींनी त्यांना विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. वारंवार पैसे भरूनही फ्रँचायझी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे अमर यांच्या लक्षात आले. सायबर पोलिसांनी कलम ३१८(४), ३१५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक एन. ए. केळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.