Breaking
Updated: एप्रिल 28, 2026
अंबाजोगाईत वकिलाचे घर फोडले; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील स्वराज्यनगर भागात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. एका नामांकित वकिलाचे घर फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
नंदकिशोर ज्ञानोबाराव शिंदे (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह एका लग्नासाठी गावी गेले होते. २६ एप्रिलच्या सकाळी १० ते रात्री ९ या दरम्यान चोरट्यांनी घराच्या कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील २० हजार रुपयांची रोकड आणि ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण ७० हजार रुपयांचा माल चोरून नेला. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.न्या.स. कलम ३०५(अ), ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.