Breaking
Updated: एप्रिल 28, 2026
पंतप्रधान आवास योजनेच्या वादातून सरपंचाच्या गाडीवर हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: पंतप्रधान आवास योजनेच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरी न केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येवलवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किशोर अंबादास नागरगोजे (वय ४४, रा. येवलवाडी) हे आपल्या कारमधून जात असताना आरोपी गहीणीनाथ बोरंग नागरगोजे, लहु सुरेश नागरगोजे आणि महेश सुरेश नागरगोजे यांनी त्यांची गाडी आडवली. पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकामाचा हप्ता काढण्यासाठी पाहणी अहवालावर स्वाक्षरी का केली नाही, असा जाब विचारत आरोपी महेश याने ‘फायटर’ने किशोर यांच्या नाकावर व कपाळावर मारून जखमी केले. इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तागड या प्रकरणाचा तपास करत आहेत.