Breaking

हॉटेल चालकावर लाकडी दांड्याने हल्ला; अंमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

Updated: एप्रिल 28, 2026

By Vivek Sindhu

पंतप्रधान आवास योजनेच्या वादातून सरपंचाच्या गाडीवर हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंमळनेर: पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी शिवार येथील गारमाथा परिसरातील हॉटेल तुळजाई समोर एका हॉटेल चालकावर लाकडी दांड्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हॉटेल चालक कृष्णा पोपट मंडलीक (वय २५, रा. भाटेवाडी, ता. पाटोदा) यांनी अंमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर नवनाथ घुमरे (वय २१, रा. उंबरहिरा, ता. पाटोदा) हा हॉटेल तुळजाईवर गेला होता. त्याने हॉटेल चालकाला बाहेर येऊन मला पार्सलमध्ये चिप्स, पाण्याची बाटली आणि स्लाईट दे अशी मागणी केली. त्यानंतर काहीही कारण नसताना आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरात प्रहार करून त्याला दुखापत केली.

हल्लेखोराने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर घटनेनंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. अंमळनेर पोलिसांनी याप्रकरणी मयुर नवनाथ घुमरे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक फौजदार राठोड हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts