Breaking

जमीन वाटून मागितली म्हणून बापाने केली पोराला मारहाण

Updated: एप्रिल 23, 2026

By Vivek Sindhu

जमीन वाटून मागितली म्हणून बापाने केली पोराला मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- मुलाने जमीन वाटून मागितली म्हणून मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे घडली आहे.

केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील प्रभाकर चौरे यांना दोन पत्नी आहेत. पहिली पत्नी मंगल चौरे हिला विष्णू चौरे नावाचा मुलगा आहे. तर दुसरी पत्नी शिवशाला चौरे हिला अंकुश चौरे, बापू चौरे, लहू चौरे आणि क्रांती चौरे असे चार अपत्ये आहेत. प्रभाकर चौरे यांना १५ एकर जमीन असून ती जमीन त्यांची पत्नी मंगल चौरे व मुलगा विष्णू चौरे हे कसत आहेत.

दि. २० एप्रिल रोजी रात्री ८:०० वा. सुमारास अंकुश चौरे व त्यांचा भाऊ लहु चौरे हे दोघे जिवाचीवाडी येथील घरी गेले.  लहु याने वडिल प्रभाकर चौरे यांना शेती वाटुन मागत असता वडील प्रभाकर चौरे यांनी त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच विष्णू चौरे हे भांडण सोडवण्यास गेले असता चुलत भाऊ दिपक बालु चौरे याने त्यांना काठीने आणि दगडाने मारहाण जखमी केले. तसेच बालू चौरे याने अंकुश आणि लहू या दोघा भावांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

अंकुश चौरे याच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात वडील प्रभाकर चौरे, चुलत भाऊ बालु बन्सी चौरे आणि अनंता नायारण चौरे व दिपक बालु चौरे या चौघांच्या विरुद्ध गु. र. नं. २२९/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम शेप हे करीत आहेत.


Categories

Recent Posts