Breaking

राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Updated: एप्रिल 22, 2026

By Vivek Sindhu

राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पार्थ अकॅडमीच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे घरबसल्या गिरवता येणार सुंदर हस्ताक्षराचे धडे – आ.नमिताताई मुंदडा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – हस्ताक्षर सुंदर आणि वळणदार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी आता येथील पार्थ सुंदर हस्ताक्षर अकॅडमीने अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करीत डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला आहे, असा प्रेरणादायी संदेश देत पार्थ अकॅडमीच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे सुंदर हस्ताक्षराचे धडे आता घरबसल्या गिरवता येणार आहेत असे प्रतिपादन आ.नमिताताई मुंदडा यांनी केले. आ.मुंदडा या राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.

नुकतेच अंबाजोगाई शहरात दि.१५ एप्रिल २०२६ रोजी पासून पार्थ अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन शिक्षण प्रणालीस सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी पार्थ अकॅडमीच्या प्रांगणात राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा २०२५-२६ मधील विजेते व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव उद्घाटक आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व.प्रमोदजी महाजन स्कूलच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी होत्या. तसेच सेवानिवृत्त शिक्षक रामराव आडे सर व प्रा.राजकुमार पवार यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पार्थ अकॅडमीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीची सुरूवात आ.मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनंतर आ.मुंदडा यांनी अकॅडमीतील डिजिटल सुविधांची पाहणी करीत त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रणालीमध्ये अत्याधुनिक डिजिटल बोर्ड, फोर के दर्जाचा उच्च गुणवत्तेचा कॅमेरा, प्रगत सर्व्हर सिस्टम व व्यावसायिक व्हिडिओ निर्मिती सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रत्यक्ष वर्गासारखा अनुभव मिळणार आहे. यावेळी अकॅडमीचे संचालक विनोद आडे यांनी प्रास्ताविक करताना अकॅडमीच्या (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटपार्थहॅण्डरायटिंगअकॅडमीडॉटकॉम) या अधिकृत वेबसाईटची तसेच गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध पार्थ हॅण्डरायटिंग अकॅडमी या मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती उपस्थितांना दिली. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी कोर्स डाऊनलोड करून सेव्ह करून कधीही पाहू शकतात व ऑनलाईन शिक्षणाची सुविधा घेऊ शकतात. तसेच पार्थ हॅण्डरायटिंग अकॅडमी या यु ट्युब चॅनलवर डेमो व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब करून ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या कोर्सचे चित्रीकरण मराठी भाषेत सुरू असून, जून-जुलै नंतर हिंदी भाषेतही कोर्स उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार हस्ताक्षर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून, पार्थ अकॅडमीचा विस्तार आता देशभर होत असल्याचे अधोरेखित झाले. तसेच या कार्यक्रमात राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सिद्धांत संदीप कापसे यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सुवर्णपदक विजेते आरूषी चंद्रकांत नांदवटे, यशश्री सिद्धेश्वर कातकडे, स्वराली औदुंबर राजमाने, सिद्धी कृष्णा लोखंडे, यश अमोल राडकर, श्रुतिका एस.देशमुख, धनश्री रमेश कांबळे, आर्या वैजनाथ देशमुख, अर्णव भगीरथ कराड, तेजल अच्युत मुंडे, शरयू गोविंद मैड, गौरी रमेश कांबळे, फैजल अझरूद्दिन शेख, आरूषी दत्तप्रसाद बाहेती व प्रथम दत्तप्रसाद बाहेती या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर अकॅडमीचा माजी विद्यार्थी व अंबाजोगाईतील युवा अभिनेता ऋषिकेश मुंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी विविध मराठी मालिकांमधील आपल्या अभिनय प्रवासाबद्दल सांगत अकॅडमीशी असलेले नाते व्यक्त केले. त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मिळाला. तसेच चिमुकली विद्यार्थीनी तेजल मुंडे हिनेही आपले अकॅडमी बद्दलचे मनोगत व्यक्त केले, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पार्थ सुंदर हस्ताक्षर अकॅडमीने सलग पाच वेळा राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले असून, एकूण आठ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होणाऱ्या या स्पर्धेत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल अकॅडमीला बेस्ट परफॉर्मन्स स्कूल हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.वैभव काळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अकॅडमीचे उपसंचालक अमोल खोकले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम पिंपळे, अश्विनी आडे तसेच सारिका आडे यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सोबत – बातमीचे फोटो.


Related Posts :

Categories

Recent Posts