Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
*मुलीला माहेरी नेण्यासाठी आलेल्या सासू-सासऱ्यांवर जावयाचा लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला*
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: वृद्ध फिर्यादी आणि त्यांच्या मुलीच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन बँक खात्यातून २ लाख २० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारत गोरख थोरात याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
६५ वर्षीय कुशिवता बाजीराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांना विश्वासात घेऊन अंगठा घेतला आणि परस्पर बँक खात्यातून पैसे लांबवले. यामध्ये फिर्यादीचे २ लाख आणि त्यांच्या मुलीचे २० हजार रुपये अशा एकूण २ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस नाईक सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.