Breaking
Updated: एप्रिल 20, 2026
रोटरी क्लब व कॉम्प्युटर वर्ल्ड चा उपक्रम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य नेमके कोणत्या क्षेत्रात आहे. याची अचूक माहिती कल चाचणी
(करियर इंक्लिनेशन टेस्ट) या माध्यमातून उलगडते. यासाठी १५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची हि चाचणी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व कॉम्प्युटर वर्ल्ड यांच्या वतीने घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त असा करिअर कलचाचणी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता व योग्य करिअर क्षेत्र याबाबत मार्गदर्शन करणे तसेच त्यावर समुपदेशन सत्र घेणे हा होता.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मागील तीन दिवसांपासून सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांचे सविस्तर रिपोर्ट तयार करण्यात आले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड, क्षमता व करिअर निवडीबाबत मार्गदर्शन
प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक रिपोर्ट कार्ड देण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना रिपोर्ट वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी या संधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. या विद्यार्थ्यांची चाचणी व त्यांना मार्गदर्शन कॉम्प्युटर वर्ल्डचे संचालक प्रा.संतोष मोहिते यांनी केले.या प्रसंगी,
रोटरी क्लबच्या अध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांना या कल चाचणीचे महत्त्व व फायदे
याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . भविष्यातील निर्णायक क्षमता वाढण्यास मदत होते यावर सांगितले.
तसेच,करिअर निवडीसंबंधी दिशा देत त्यांना प्रोत्साहित केले.करिअर निवडीसाठी योग्य दिशा देणारा हा उपक्रम भविष्यातील यशस्वी आयुष्याची पायाभरणी करणारा वर्कशॉप ठरला.यावेळी
रुपेश रामावत,प्रा. अजय पाठक, धनराज सोळंकी, यांची उपस्थिती होती.