Breaking
Updated: एप्रिल 20, 2026
कामातुराणां न भयं न लज्जा!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- कामातुराणां न भयं न लज्जा। असे एक का संस्कृतमध्ये सुभाषित आहे. आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार बीड जिल्ह्यात घडला असून मुलगा आणि सावत्र आई हे प्रेमी युगुल पळून गेले आहेत.
केज तालुक्यातील एका गावात एका जोडप्याला दोन मुले व दोन मुली असून दोन्ही मुलींचे लग्न झालेली आहेत. पती-पत्नीत भांडण होत असल्याने त्या इसमाची पत्नी मागील पंधरा वर्षा पासून विभक्त राहत आहे. त्याची दोन्ही मुले मात्र वडीलांच्याकडे राहत आहेत आणि ते शेती करीत आहेत. कौटुंबिक अडचणीमुळे त्या इसमाने मागील चार वर्षा पूर्वी एका परित्यक्ता महिले सोबत दुसरे लग्न केले. तो इसम त्यांच्या पहिल्या पत्नी पासून झालेली दोन मुले आणि त्याची दुसरी पत्नी हे एकत्र राहत आहेत. मात्र जसे संस्कृत मध्ये म्हटले आहे की, कामातुराणां न भयं न लज्जा। म्हणजे एकदा वासनेची हवा डोक्यात गेली की, माणूस पशू सारखे वर्तन करतो. त्याला नात्याचे भान राहत नाही.
मात्र आई मुलाचे नाते विसरून काम वासनेने वेडी झालेल्या महिला तिचा पती १२ एप्रिल रोजी मुंबई येथील रत्नेश्वरी देवीच्या देवदर्शनासाठी यात्रेला जाताच ती सावत्र आई आणि तिच्या सवतीचा मुलगा हे दोघे
दि. १५ एप्रिल रोजी सवतीच्या मुलाच्या त्या प्रमाणे सावत्र आई आणि मुलाचे एकमेकांवर प्रेम जडले आणि ती प्रेमात वासनेने आंधळी झालेली चाळीस वर्षाची महिला नवऱ्याला सोडून सवतीच्या पोरा सोबत पळून गेली आहे.
सावत्र आई सोबत पळून गेलेल्या जोडप्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.
परंगदा महिलेच्या नवऱ्याने दिली पोलिसात तक्रार :
पोरा सोबत सावत्र आईने धूम ठोल्याची तक्रार त्या महिलेच्या नवऱ्याने दिली आहे. मात्र पुढे काय ? एका बाजूला पळून गेलेली बायको, तर दुसऱ्या बाजूला पळवून नेणारा मुलगा अन् पळून जाताना जी मोटार सायकल घेऊन पळून गेली ती मोटार सायकल जावायाची अशा तिहेरी कचाट्यात बाप अडकला आहे.
सावत्र आई आणि मुलाचे प्रेमी युगुल तेलंगणा राज्यात
सावत्र आणि आणि मुलगा यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली मोटार सायकल क्र. (एम एच १३/बी यू १५८७) ही त्या इसमाच्या सावत्र जावयाच्या नावावर नोंद आहे. त्यामुळे त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मोटार सायकलीने वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याने १६ एप्रिल रोजी सकाळी ११:५६ तेलंगणा राज्यात वाहतूक पोलिसांनी तेलंगणा राज्यात इंदिरा नगर, गच्चीबोली येथे १ हजार २३५ रु. चा दंड केलेला असल्याचे मेसेज आला आहे.
नात्याचा जांगडगुत्ता
बायकोला पळवून नेणारा मुलगा तर पळून जाण्यासाठी वापरलेली मोटार सायकल जावयाची. आता बायकोला सून म्हणावे की, बायको ! असा हा नात्याचा जांगडगुत्ता झाला आहे.