Breaking
Updated: एप्रिल 18, 2026
राज्य गुणवत्ता यादीत ४८ विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर आयएएस (Jr.IAS) स्पर्धा परीक्षेत प्रमोदजी महाजन न्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादित करत राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान पटकावले असून, राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान यंदाही शाळेने कायम राखला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांच्या एकत्रित परिश्रमातून हे उत्तुंग यश मिळाल्याची भावना शालेय प्रशासनाने व्यक्त केली आहे.
स्पर्धेच्या सविस्तर निकालात इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात बाजी मारली आहे. यामध्ये इयत्ता दुसरीतून ऋतुराज राहूल पवार, तिसरीतून अद्वैत सुरज होळंबे, चौथीतील वेदिका व्यंकट कराड, पाचवीतील यशराज पंडित चाटे व धीरज बाळासाहेब लटपटे, सहावीतील वैष्णवी संजय भोसले आणि सातवीतील राधाराणी उमेश इरलापल्ले यांनी आपापल्या इयत्तेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या लौकिकात भर घातली. यासह अद्विका राठोड, श्रीअंश फपाळ, आरुष खंडागळे, सौमित्र रामदासी आणि इतर अनेक विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकासह राज्य गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई महाजन आणि माजी खासदार पूनम महाजन-राव यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच संस्थापक अध्यक्षा मंगलताई कुलकर्णी, कार्यकारी अध्यक्ष कमलाकर कोपले, सचिव शैलेश कुलकर्णी, सदस्य संजय फड आणि मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षांच्या युगात शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची पायाभरणी भक्कम व्हावी, या उद्देशाने शाळेने घेतलेले कष्ट या निकालातून दिसून येत आहेत.