Breaking
Updated: एप्रिल 8, 2026
तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे १० ची परीक्षा दिलेल्या अनुजा सूर्यकांत मावकर १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दि. ७ एप्रिल रोजी आई-वडीला सोबत घरी जेवण केले. त्या नंतर तिचे आई-वडील जनावरांना चारा पाणी करीत असताना त्यांची मुलगी अनुजा ही रात्री १०:०० च्या सुमारास घरात गेली आणि तिने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. मुलगी आवाज देऊनही घर उघडत नसल्याने आईने दरवाजा शेजारी असलेला काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. तेव्हा अनुजाने घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकला तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले.
या प्रकरणी अनुजाजचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अक्षय भगवान काळे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १८६/२०२६, भा. न्या. सं. ७८(१), १०७ आणि पोक्सोचे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत.
________________________________
अनुजा तणावात होती :- दि एप्रिल रोजी दुपारी ४:०० ते ५:०० वा सुमारास अनुजा हिचे आईवडील सर्वजण शेतात गेले असतांना अक्षय हा घरा जवळ येवुन थांबला होता. त्याला पहाताच त्याच्या भीतीने अनुजा ही घरात पळुन गेली. या विषयी अनुजा हिने तिचे आई वडील घरी आल्या नंतर त्यांना ही माहिती दिली होती. यामुळे ती मानसिक तणावाखाली होती.
________________________________
अनुजा नववीच्या वर्गात शिकत असल्या देत होता त्रास :- अनुजा ही चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालय येथील ९ वी च्या वर्गात शिकत असताना अक्षय काळे हा तिचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने अनुजाला मागील वर्षी जबरदस्तीने मोबाईल दिला होता. या विषयी अनुजाने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. या बाबत त्याला त्याच्या आप्तेष्टांनी देखील समज दिली होती. त्या नंतर काही दिवस तो शांत राहिला. पुन्हा अनुजाला त्रास देणे सुरू केले. त्यामुळे अनुजाला केज येथे सरस्वती विद्यालय केज येथे शिक्षणासाठी ठेवले व ती हॉटेलला राहत होती. तरी देखील अक्षय हा अनुजा हिस हॉस्टेलला जाऊन त्रास देत होता. या त्यांच्या त्रासाला कंटाळून तिला पुन्हा तिला गावी आणले. तिची दहावीची परीक्षा झाल्या नंतर त्याने पुन्हा तिला मोबाईल दिला होता.