Breaking

मोहखेडमध्ये बंद घर फोडून १.१३ लाखांचा ऐवज लंपास

Updated: मार्च 21, 2026

By Vivek Sindhu

साखर कारखान्यातील इंजिनिअरच्या घरावर डल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

साखर कारखान्यातील इंजिनिअरच्या घरावर डल्ला

धारूर: धारूर तालुक्यातील मोहखेड येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून १ लाख १३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कृष्णा कानिफनाथ सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरसळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा सोळंके (वय ३३) हे तेलगाव येथील सहकारी साखर कारखान्यात असिस्टंट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. १८ मार्च २०२६ रोजी रात्री सात वाजता ते मोहखेड येथून कारखान्यात आपल्या ड्युटीवर गेले होते. सोळंके यांचे आई-वडील १२ मार्चपासून चारधाम यात्रेसाठी गेले असून पत्नी मुलासह माहेरी गेलेली असल्याने ते घरी एकटेच राहत होते. १९ मार्च रोजी पहाटे पाच वाजता ड्युटी संपवून सोळंके घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले दिसले.सोळंके यांनी घराच्या आत प्रवेश केला असता कपाटातील सामान आणि कपडे बेडवर अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी कपाटातून पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ५० हजार रुपयांची नगदी रोकड असा एकूण १ लाख १३ हजार ९०० रुपयांचा माल चोरून नेला. शिरसळा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts