Breaking
Updated: मार्च 13, 2026
पेशवा प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त महिला बँक कर्मचाऱ्यांचा सन्मान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – महिला दिनानिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दीनदयाल नागरी सहकारी बँकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान संचालिका शरयू हेबाळकर आणि उद्योजिका अलका देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता औटी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कल्याणी कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचलन व नियोजन प्रतीक्षा जोशी यांनी केले.
या कार्यक्रमात बँकेतील,गोस्वामी प्रतिभा ,टाक सुप्रिया पांडुरंग .डाके सुजाता कंगळे, समीक्षा मनोज ,पांडे अल्का कुलकर्णी, करुणा कल्याणराव ,शिंदे रुपाली अंकुशराव,राठोड छाया पंडीतराव ,पोटलावार कविता कृष्णा या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन मनिषा कुलकर्णी यांनी केले. तर प्रणिता पोखरीकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या प्रतीक्षा जोशी, राजश्री पिंपळे,ज्योत्स्ना लाटकर, स्मिता भातलवंडे , रेणुका भालेराव,राजश्री देशमुख, मनिषा उपळाईकर, उमा देशमुख, ऋतुजा कोंडपल्ले, रोहिणी मुडेगावकर, सई पिंपळकर यांनी पुढाकार घेतला.