Breaking
Updated: एप्रिल 29, 2026
जयंती कार्यक्रमानंतर तरुणावर प्राणघातक हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अतुल मधुकर सुरवसे वय २६ वर्षे या तरुणाने याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी जेवायला जात असताना आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली.
आरोपी प्रशांत सुरवसे, प्रतिक सुरवसे, शोभा सुरवसे आणि त्यांच्या पाच नातेवाईकांनी संगनमत करून अतुलवर हल्ला केला. विनाकारण शिवीगाळ करत आरोपींनी अतुलला गंभीर जखमी केले. धारूर पोलिसांनी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार भताने तपास करत आहेत.