Breaking
Updated: एप्रिल 29, 2026
अपे रिक्षातील प्रवासात १ लाख ६० हजारांचे दागिने लंपास; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: बीड शहरातील शिवराज पान सेंटर ते जरूड फाटा दरम्यान अपे रिक्षामधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. मिनाबाई शंकर पवार वय ५० वर्षे, राहणार पालवण चौक यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. फिर्यादी महिला रिक्षामधून प्रवास करत असताना ही चोरीची घटना घडली.
अज्ञात चोरट्याने मिनाबाई यांच्या बॅगचे लॉक तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरले आहेत. चोरलेल्या ऐवजामध्ये ८.५ ग्रॅमचे झुंबर, ४ ग्रॅमचे वेल, १६ ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, १ ग्रॅमची नथ आणि ९ भार वजनाची जोडवी यांचा समावेश आहे. या चोरीला गेलेल्या जुन्या दागिन्यांची अंदाजे किंमत १,६०,००० रुपये आहे. आष्टी पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भंडाणे तपास करत आहेत.