Breaking
Updated: फेब्रुवारी 12, 2026
सिमेंटच्या गोणीतून गांज्याची तस्करी; दोघे ताब्यात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर पोलिसांच्या कारवाईत पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
नेकनुर – जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवायांचे सत्र सुरु असताना नेकनूर पोलिसांनी गांज्याची तस्करीचे रॅकेट उघडकीस केले आहे.सिमेंटच्या गोणीतून गांज्याची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी एका शेतात छापा मारून याचा फर्दाफ़ाश केला.या कारवाईत 11 किलो 150 ग्रॅम गांजा ज्याची किंमत 2 लाख 78 हजार 750 रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.नेकनूर पोलिसांनी ावेळी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केले.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी बुद्रुक गावात एका उसाच्या शेतात सिमेंटच्या गोणीत गांज्या भरून ठेवण्यात आलाहोता.याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी व त्यांच्या टीमने छापा मारला. यावेळी शेतात दोन सिमेंटच्या गोणीत 11 किलो 150 ग्रॅम गांज्या पोलिसांना सापडला.या गांज्याची तस्करी होणार असतानाच पोलिसांनी गुमानसिंग शिवराम पावरा (वय-35, रा. बोरमल्ली पाडा, ता. शिरपूर, जि.धुळे)
व मनोज सीताराम मेहता (वय19, रा.बाखरली, ता.वरला, जि.बडवानी राज्य. मध्यप्रदेश) या दोघांना रंगेहात पकडले आहे. नेकनूर ोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करीत आहेत.