Breaking

दारूसाठी पैसे न दिल्याने नातवाने केली आजोबांची हत्या; परळीतील घटना

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

दारूसाठी पैसे न दिल्याने नातवाने केली आजोबांची हत्या; परळीतील घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: दारू पिण्यासाठी आणि मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने आपल्या सख्ख्या आजोबांची लाथाबुक्क्यांनी छातीवर व पोटावर मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना मिलिंदनगर येथे घडली आहे.

द्रोपदीबाई रामभाऊ गायकवाड (वय ७०, रा. मिलिंदनगर, परळी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी आरोपी शुभम बाळू गायकवाड (वय २७) याने आपल्या आजोबांकडे दारू आणि मोबाईलसाठी पैशांची मागणी केली होती. आजोबांनी पैसे देण्यास नकार दिल्याने शुभमने संतापून त्यांना लाथाबुक्क्यांनी छातीवर आणि पोटावर जोरात मारहाण केली. या मारहाणीत आजोबांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र चौकशीत नातवानेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले. परळी पोलिसांनी नातवाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts