Breaking
Updated: जानेवारी 27, 2026
धारूर बसस्थानकावर मंगळसूत्र चोरणारी महिला रंगेहात पकडली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: धारूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला चोरटीला प्रवाशांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
रुक्मिणीबाई बाबासाहेब मैंद, वय ६५ वर्षे, राहणार मैंदवाडी, तालुका धारूर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. रुक्मिणीबाई या पंढरपूरला जाण्यासाठी परतूर-पंढरपूर बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन आरोपी महिला जयश्री संतोष जाधव, राहणार वीड, हिने रुक्मिणीबाई यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्राची फिरकी काढून ते चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच लक्षात आल्याने त्या महिलेला जागीच पकडण्यात आले.
धारूर पोलिसांनी जयश्री जाधव विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ६२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार दुधाने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.