Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
आडसकर यांनी शेतवस्तीवर जाऊन केला सत्कार !
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज तालुक्यातील साळेगाव येथील एका तरुणाची केंद्रिय राखीव पोलिस दलात निवड झाल्याची माहिती मिळताच रमेश आडसकर यांनी थेट शेतवस्तीवर जाऊन त्याचा सत्कार केला.
या बाबतची माहिती अशी की, साळेगाव येथील शेतकरी सुधार इंगळे यांचा मुलगा
चि. अजय सुधाकर इंगळे याची केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. ही माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीड जिल्ह्याचे नेते तथा अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इतरमेश आडसकर यांना माहिती मिळाली. माहिती मिळताच रमेश आडसकर हे थेट साळेगाव येथील इंगळे वस्तीवर पोहोचले आणि त्यांनी अजय इंगळे याचा सत्कार केला. यावेळी साळेगावचे सरपंच कैलास पाटील, माजी सरपंच नारायण दादा लांडगे, चिंचोली माळीचे सरपंच सुनील बापू देशमुख, रवी गलांडे, माने, रामभाऊ गलांडे, संदीप राऊत, उपसरपंच गणेश गालफाडे, ग्रामविकास अधिकारी राजेभाऊ वरपे, ग्रामसेवक अंकुश इंगळे, ॲड. गणेश स्वामी, राजाभाऊ तिडके, अशोक टोपे, संजय इंगळे, विश्वनाथ पटणे, सौरभ राजेभाऊ वरपे, राजकुमार गित्ते, मधुकर अंधारे, बाबा अंधारे, तुषार लांडगे, नामदेव लांडगे, संतोष मेडकर यांच्यासह वस्तीवरील नागरिक इंगळे परिवार आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
________________________________
प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले :- अजय इंगळे याचे कुटुंब साळेगाव पासून सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या इंगळे वस्तीवर राहात आहे. आई वडील शेतकरी आहेत. मात्र अजय याने जिद्द मनाशी मागून सराव केला आणि तो यशस्वी झाला.