Breaking
Updated: जानेवारी 10, 2026
कानडी रोडवर मध्यधुंद कार चालकाने दोघांना उडवून कार दुकानात घुसवली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelतिघे जखमी तर दोन मोटार, एक स्कूटर आणि विद्यार्थ्याची सायकलीचे नुकसान
गौतम बचुटे/केज :- केज शहरातील गजबजलेल्या कानडी माळी चौकात कानडी रोडवर एका मद्यधुंद कार चालकाने एका मोटार सायकलीला ठोकरून पळून जाण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्याला ढेकूण एका दुकाना समोर उभ्या असलेल्या मोटार सायकल आणि स्कूटरला धडक दिली आणि कार दुकानात घुसवली.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास केज येथील कानडी माळी चौकात एक स्विफ्ट डिझायर कार क्र. (एम एच- १२/एच झेड- २६६२) च्या मद्यधुंद अवस्थेतील कार चालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा ) आणि त्याच्या शेजारी बसलेला धनराज बन्सी चाळक ( रा. लव्हूरी ता. केज) मद्यधुंद अवस्थेतील नातेवाईक यांनी कानडी माळी चौकातील भगवान बाबा चबुतऱ्या जवळ कानडी माळीकडे वळत असताना एका मोटार सायकलीला मागून धडक दिली. त्या मोटार सायकलवर मागे बसलेली महिला आशाबाई धोंडीबा राऊत ( रा. समर्थनगर केज) या जखमी झाले. त्या नंतर तो भरधाव वेगात पळून जात असताना त्याने उजव्या बाजूला असलेल्या नेहा ब्युटी शॉपी आणि साई मंगल सेवा केंद्र या दुकानाला धडक दिली. या अपघातात दुकाना समोर उभी असलेली एक स्कुटी क्र. (एम एच-४४/ए डी-९४८०) आणि मोटार सायकल क्र (एम एच-२५/एस-१७२३) यांचे नुकसान झाले. तर रस्त्याने सायकल वरून शाळेला जात असलेल्या विद्यार्थ्याची सायकल ची नुकसान झाले आहे. तर अपघात काही नागरिक देखील व विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघात मोटार सायकलवर मागे बसलेल्या आशाबाई धोंडीबा राऊत ( रा. समर्थनगर केज) आणि कारचालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा ) आणि त्याच्या सोबत असलेला धनराज बन्सी चाळक ( रा. लव्हूरी ता. केज) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, दत्तात्रय बिक्कड, राजू वाघमारे, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, त्रिंबक सोपने, संतोष गित्ते, गोरख फड, तांबारे यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली.