Breaking

केज येथे वृद्धाची आत्महत्या 

Updated: जानेवारी 7, 2026

By Vivek Sindhu

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :-   केज शहरातील फुले नगर येथे एका ७२ वर्षीय इसमाने त्यांच्या मेव्हण्याच्या घरी पायऱ्याच्या ग्रीलला गमज्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील बहुला (ता. कळंब) येथील गुलाब विठ्ठल पवार (वय ७२) हे त्यांचे मेव्हणे गोरोबा सखाराम मस्के यांच्या केज शहरातील फुलेनगर भागातील घरी आले होते. गुलाब पवार यांनी ६ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास गोरोबा मस्के यांच्या घराच्या पायऱ्याच्या ग्रीलला गमज्याने गळफास लावून आत्महत्या केली. 

अक्षय गोरोबा मस्के यांच्या खबरे वरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस शिपाई नितीन जाधव हे करीत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts