Breaking

अफवेमुळे बुलढाणा बँकेत सोने तारण सोडवण्यासाठी ग्राहकांची गर्दी

Updated: डिसेंबर 31, 2025

By Vivek Sindhu

अफवेमुळे बुलढाणा बँकेत सोने तारण सोडवण्यासाठी ग्राहकांची गर्दी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

किल्लेधारूर – शहरातील बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरलेल्या अफवेने सोमवारी एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बँक अडचणीत असल्याची व तारण ठेवलेले सोने सुरक्षित नसल्याची अफवा सोशल मीडियावर व तोंडी चर्चेतून पसरताच सकाळपासूनच बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. अनेक ग्राहकांनी घाईघाईने आपले सोने तारण सोडवण्यासाठी बँकेत धाव घेतली.
ता.३० रोजी बुलढाणा बँक बंद होणार असल्याचे अफवेने शहरातील केज रोडवरील शाखेत ग्राहकांनी सोने तारण,फिक्स डिपॉजिट काढण्यासाठी गर्दी केली होती.काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले.बँक बंद होणार,सोने मिळणार नाही,अशा अफवांमुळे अनेकांनी इतर कामे बाजूला ठेवून बँकेत हजेरी लावली.
दरम्यान, बँक प्रशासनाने तात्काळ भूमिका घेत ही अफवा निराधार व खोटी असल्याचे स्पष्ट केले. बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राहकांशी संवाद साधत बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून सर्व व्यवहार नियमित सुरू असल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांचे सोने पूर्णतः सुरक्षित असल्याची हमी देण्यात आली.
अफवांमुळे अनावश्यक गोंधळ निर्माण होत असून, अशा प्रकारांमुळे सामान्य ग्राहकांचे मानसिक व आर्थिक नुकसान होऊ शकते, असे मत काही ग्राहकांकडून करण्यात आले.


Categories

Recent Posts