Breaking
Updated: डिसेंबर 30, 2025
तांबवा येथे शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या १४ वर्षीय मुलीने घरातील सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तांबवा (ता. केज) येथे २८ डिसेंबर रोजी दुपारी घडली. तनुजा गोविंद चाटे असे या मुलीचे नाव असून तिने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
तांबवा येथील तनुजा गोविंद चाटे (वय १४) ही केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेत इयत्ता ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. २८ डिसेंबर रोजी दुपारी तनुजा चाटे हिने घरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रुमचा दरवाजा आतून बंद करून सीलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार उमेश निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.