Breaking
Updated: डिसेंबर 24, 2025
चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – तमाशाच्या कार्यक्रमात स्टेजवर कलावतांना पैसे देण्यास गेलेल्या तरुणास १२ जणांनी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी बुधवारी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील सोनीजवळा येथे दरवर्षी म्हसोबा यात्रेनिमित्त २१ डिसेंबर रात्री नऊ वाजता तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. याचवेळी सुधीर प्रकाश वैरागे हा तरुण मुकादम तमाशातील कलावंतांना पैसे देण्यास स्टेजवर गेला असता अशोक निवृत्ती वैरागे, राजू निवृत्ती वैरागे, वसंत निवृत्ती वैरागे, कृष्णा शंकर वैरागे, प्रभू मस्सा वैरागे, विशाल प्रभू वैरागे, प्रताप अशोक वैरागे, आकाश अशोक वैरागे, सचिन साहेबराव वैरागे, गणेश साहेबराव वैरागे, शंकर मस्सा वैरागे, शौर्या उत्तरेश्वर लोंढे (सर्व रा. सोनीजवळा) यांनी स्टेजवर जाऊन काठ्याने व लोखंडी पाईपने सुधीर वैरागे यास पाठीवर, हाताचे दंडावर, खांद्यावर व डोळ्याच्या भवईवर बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. तर सोडविण्यास आलेल्या साक्षीदारास ही काठीचा मार बसला. बुधवारी सुधीर वैरागे याने दिलेल्या तक्रारीवरून वरील १२ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार सुरेश गित्ते हे करीत आहेत. दरम्यान, या मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.