Breaking
Updated: डिसेंबर 22, 2025
शिवरस्त्याच्या वादावरून शेतकऱ्याला बेदम मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरातील मुख्य रस्त्यालगत हातगाडा लावून वाहतुकीस व पदचाऱ्यांना जाण्यायेण्यास अडथळा करणाऱ्या आणखी दोन हातगाडा चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
केज शहरात मुख्य रस्त्यालगत अस्ताव्यस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तर फळ विक्रेते व हातगाडा लावणाऱ्या विक्रेत्यांना रस्त्यावर अडथळा होईल, असे हातगाडे लावू नयेत, अशा सूचना ही दिलेल्या आहेत. फौजदार बालासाहेब रोडे, सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रकाश मुंडे हे या मुख्य रस्त्यावर पायी पेट्रोलिंग करीत असताना कानडी चौक येथे एस.एस. मोबाईल शॉपीच्या समोर मुख्य रस्त्यावर सोहेल अय्युब बागवान (रा. रोजा मोहल्ला, केज) याने केळीचा हातगाडा हा येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा धोकादायक स्थितीत उभा केला होता. त्याचबरोबर बसस्थानक जवळील तांबवेश्वर मेडीकल समोर मुख्य रस्त्यावर अलिम मोहमद शरीफ बागवान (रा. रोजा मोहल्ला, केज) याने ही वटाण्याच्या शेंगाचा हातगाडा हा येणाऱ्या – जाणाऱ्या पादचारी व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा धोकादायक स्थितीत उभा केला होता. फौजदार बालासाहेब रोडे यांच्या तक्रारीवरून सोहेल बागवान व अलिम बागवान या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, दुकाने आणि हॉटेलसमोर वाहने लावली जात असून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या कळंब व बीड रस्त्यावर वाहने उभी करून प्रवाशी भरली जातात. या वाहनांचा वाहतुकीसह रस्त्याने जाणाऱ्या लोकांना अडथळा होत आहे. याकडे ही पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.