Breaking

बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून आर्मी कार्यालयात फसवणूक; पत्नीवर गुन्हा दाखल

Updated: डिसेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

पैशांच्या वादातून वृद्धाला मारहाण; मुलानेच बापाला टिफणीच्या नळीने बडवले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्रामपंचायतीचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून ते आर्मीच्या कार्यालयात सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवन त्रिंबक जगदाळे (३३, रा. आष्टी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी प्रियांका जीवन जगदाळे (२४, रा. सध्या मुंबई) हिने ३० डिसेंबर २०१७ आणि ८ जुलै २०२४ या कालावधीत कासारी/मुर्शदपूर ग्रामपंचायतीचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार केले. हे खोटे प्रमाणपत्र तिने फिर्यादीच्या आर्मी कार्यालयात देऊन त्याचा गैरवापर केला आणि स्वतःचा फायदा करून घेतला, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात प्रियांका जगदाळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गिराम करीत आहेत.


Categories

Recent Posts