Breaking
Updated: डिसेंबर 1, 2025
शेतकर्याच्या ऊसाला प्रतिटन ४ हजार रूपये भाव जाहिर करा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – मागील अनेक दिवसांपासुन शेतकरी ऊसाला प्रतिटन ४ हजार रूपये भाव घोषित करावा यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या आंदोलनाची व मागणीची दखल घेवून राज्य सरकारने प्रतिटन ४ हजार रूपये भाव जाहिर करावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे व अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी मुख्यमंत्री यांना उपजिल्हाधिकार्यांमार्फत सोमवार, दि.०१ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक दिवसांपासुन बीड जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक कारखान्याकडे जावून त्या ठिकाणी कारखान्याचे एम.डी. व चेअरमन आणि संचालक यांना निवेदन देत आहेत. या निवेदनात शेतकर्याच्या ऊसाला प्रति टन चार हजार रूपये भाव घोषित करावा. यासाठी निवेदन देत आहेत. अद्यापर्यंत कोणत्याही कारखान्याने प्रति टन भाव जाहिर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. म्हणून राज्य सरकारने ऊसाला प्रति टन चार हजार रूपये भाव जाहिर करावा अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही. तर शेतकर्यांच्या प्रश्नावर समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव तथा चर्मकाल सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड.शिवाजीराव कांबळे, अंबाजोगाई शहराचे अध्यक्ष राजेश परदेशी, महिला आघाडीच्या प्रमुख सालेहा जिलानी शेख व शेख जिलानी यांच्या स्वाक्षर्या आहेत.