Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज ठाण्यात यंत्र चालकाविरुद्ध गुन्हा
केज – विद्युत महावितरणच्या ऑपरेटरने (यंत्र चालक) दारूच्या नशेत उपकेंद्रात तपासणीस आलेल्या आपल्या वरिष्ठ महिला कनिष्ठ अभियंत्याशी विनाकारण वाद घालून गैरवर्तन केल्याचा प्रकार कानडीमाळी (ता. केज) येथील विद्युत उपकेंद्रात घडला. याप्रकरणी ऑपरेटर शंकर ठोंबरेविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
विद्युत महावितरणच्या केज ग्रामीण – १ कार्यालयात शीतल वाजिदअली सय्यद या कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असून त्या १४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास कानडीमाळी उपकेंद्रात तपासणीसाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी असलेले ऑपरेटर (यंत्र चालक) शंकर हे विनाकारण विना आवश्यक गोष्टीसाठी वाद घालून जोरजोरात ओरडू लागले. त्यांचा दारू सेवन केल्याचा वास आल्याने त्यांनी दारूचे सेवन केले का ? अशी विचारणा करीत मेडिकल तपासणीचा आग्रह केला. मात्र ठोंबरेने दारू घेतली नसल्याचे व मेडिकल करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता डाकरे यांना माहिती देऊन त्या घरी निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांनी मेडिकल करण्यासाठी ठोंबरेस पत्र दिले. त्यावरून येथील उपजिल्हा रुग्णालयात ब्लड सॅम्पलमध्ये घेतले. २० नोव्हेंबर रोजी आलेल्या तपासणी अहवालात त्या दिवशी ठोंबरे हे दारूच्या अंमलाखाली होते. असे स्पष्ट झाल्याने शंकर ठोंबरे याने विनाकारण दारूच्या नशेत असताना वाद घालून गैरवर्तन केल्याची तक्रार कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांनी दिल्यावरून शंकर ज्ञानोबा ठोंबरेविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.