Breaking

अंबाजोगाईत आजपर्यंत 19 उमेदवारांची नगर परिषद निवडणुकीतून माघार

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

images 35

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी एकूण 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगरसेवक पदासाठीच्या 18 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे आणि मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी दिली. शुक्रवारी (दि.२१) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आणखी किती उमेदवार निवडणुकीतून बाहेर पडतात याबाबत नागरिकत उत्सुकता आहे.

सुमारे नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत तिहेरी चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी राजकिशोर मोदी विरुद्ध नंदकिशोर मुंदडा अशी मुख्य लढत होत असून काँग्रेसचे असिफोद्दीन खतीब आणि मूळ भाजपच्या असलेल्या शोभा लोमटे (अपक्ष) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याआहेत. मोदी यांची लोकविकास आघाडी आणि मुंदडा यांची जनविकास आघाडीचे प्रत्येकी ३१ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत असून कॉंग्रेसचे 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे तीन गटांमध्ये संघर्ष तीव्र होत असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांच्या प्रचारयात्रानी अंबाजोगाईचे वातावरण निवडणूकमय झाले आहे. गल्लोगल्ली, कार्यालयात सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरु आहे. नेत्यांच्या कॉर्नर बैठका, गुप्त बैठकांना जोरात सुरु असून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच गट कामाला लागले आहेत. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता मतदानाच्या दिवस जवळ येईल तसे तसे शहरातील वातावरण संवेदनशील होण्याची चिन्हे आहेत.

गुरुवारी (दि.२०) अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची अधिकृत यादी

मोदी सुनीता राजकिशोर – प्रभाग 1 योगेश्‍वरी
शेख जाहेदा बेगम रफिक – प्रभाग 1 योगेश्‍वरी
हेडे कमलाकर महादेवराव – प्रभाग 2 रविवार पेठ
मणियार अबु असिम म. फारोख – प्रभाग 2 रविवार पेठ
काळे स्नेहा सुदर्शन – प्रभाग 2 रविवार पेठ
हेडे शिला कमलाकर – प्रभाग 2 रविवार पेठ
लोमटे अश्विनी किशोर – प्रभाग 5 परळी वेस
कराड जीवनराव नामदेवराव – प्रभाग 6 आदर्श कॉलनी
वाघाळकर सुषमा सुनिल – प्रभाग 6 आदर्श कॉलनी
गोस्वामी कल्पना श्रीकांत – प्रभाग 6 आदर्श कॉलनी
मोदी शुभांगी अलोक – प्रभाग 10 गुरुवार पेठ
सय्यद हुजैफा फारान ताहीर – प्रभाग 10 गुरुवार पेठ
सरवदे ज्योती धम्मपाल – प्रभाग 11 गवळीपुरा
सरवदे सोनाली गुरु – प्रभाग 11 गवळीपुरा
गवळी जावेद इस्माईल – प्रभाग 11 गवळीपुरा
शेख नुजहत तरन्नुम – प्रभाग 12 सदर बाजार
जगदाळे प्रियंका महादेव – प्रभाग 13 एसआरटी दवाखाना
पठाण सैफ खान अमजद खान – प्रभाग 14 लाल नगर
मोदी संकेत राजकिशोर – नगराध्यक्ष पद

या माघारीनंतर अनेक प्रभागांमध्ये निवडणूक सरळ लढत आणि काही ठिकाणी चुरशीची परिस्थिती निर्माण झाली असून पुढील प्रचारयुद्ध अधिक रंगतदार होणार आहे.


Categories

Recent Posts