Breaking

पोलिसांची छापेमारी सुरू असताना मटका सुरू

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

एकास पकडले, मटका किंग गणेश खराडेसह दोघांवर गुन्हा

केज – केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी मटका जुगार आड्यावर छापेमारी करून मटका बुक्या सुरू ठेवल्याने पोलिसांनी एकास पकडले. त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, नगदी रक्कम व मोबाईल जप्त केला. याप्रकरणी मटका किंग गणेश खराडेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरात व ग्रामीण भागात मटका किंग गणेश खराडे याने मटका जुगाराचे जाळे पसरविले आहे. मटका बुक्या राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास येताच केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंकटराम यांनी अंबाजोगाईच्या पोलिसांच्या मदतीने शहरात छापेमारीचे सत्र सुरू केले होते. अनेक मटका बुकी एजंटवर कारवाई करीत मटका किंग गणेश खराडे, चांद शेख व अनेक एजंटवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी ही धाडी मारल्या होत्या. त्यातून ही जनावरांच्या सरकारी दवाखाना परिसरात चालता फिरता गैबो‌द्दीन अहेमद शेख (रा. कोकीजपीर मोहल्ला, केज) हा एजंट गणेश खराडेच्या सांगण्यावरून १० टक्के कमिशनवर मटका जुगार घेत होता. ही माहिती मिळताच फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पोलीस नाईक संतोष गित्ते यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ७.५५ वाजेच्या सुमारास छापा मारून गैबोद्दीन शेख यास पकडले. त्याच्याकडील मटका जुगाराचे साहित्य, नगदी तीन हजार ३० रुपये व चार हजाराचा मोबाईल जप्त केला. फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून गणेश खराडे, गैबोद्दीन शेख विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts