Breaking

एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या विम्याचे १० लाख रुपये कायम अपंगत्व आल्यामुळे मिळाले

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या विम्याचे १० लाख रुपये कायम अपंगत्व आल्यामुळे मिळाले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची नागापूर शाखा, परळी वैजनाथ येथील ग्राहक उमाकांत काजगुंडे यांना शेतात विजेचा धक्का लागल्याने एक हात गमवावा लागला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. त्यांचा एसबीआय बँकेचा अपघाती विमा काढला असल्याने त्यांना कायमच्या अपंगत्वाच्या दाव्यासाठी विमाधारकास १० लाख रुपयांची मोबदला रक्कम दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दिल्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम मिळाल्याने विमाधारकाच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळाला आहे.

अशा प्रसंगी एसबीआय जनरल इन्शुरन्सचे निलवीराज चोपडे यांनी वेगाने कार्यवाही करून दाव्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि रक्कम दिली.

या संदर्भात एसबीआय बँकेचे व्यवस्थापक निकुंज कुमार म्हणाले, “आमच्या ग्राहकांना अडचणीच्या वेळी सहाय्य करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्री. उमाकांत काजगुंडे यांच्या दाव्याची वेगाने प्रक्रिया करून रक्कम दिली गेली, यामुळे आम्हाला समाधान आहे. अशा प्रसंगी विमाधारकांनी दावा सादर करण्यासाठी अडचणू नये याची आम्ही काळजी घेतो.”

या प्रसंगामुळे दुर्घटना किंवा अपंगत्वासारख्या गंभीर प्रसंगात विमा उतरवण्याचे महत्त्व पुन्हा एकदा उजेडात आले आहे. एसबीआय या कार्यामुळे इतर विमाधारकांनाही आपल्या विम्याचे फायदे जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

श्री. काजगुंडे यांनी आपल्या आनंदाची व्यक्त करताना म्हटले, “या आर्थिक मदतीमुळे आमच्या कुटुंबाला एक नवी दिशा मिळाली आहे. मी सर्वांना विमा उतरवण्याची शिफारस करतो.”


Categories

Recent Posts