Breaking

तोंडावर बुक्की मारून वृद्धाचे दात पाडले ; मुलगा, सुनेस ही मारहाण

Updated: नोव्हेंबर 14, 2025

By Vivek Sindhu

Daraḍavāḍīta gharaphōḍī; 2 lākha 62 hajārān̄cā aivaja lampāsa

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – शेतातील गवत काढत असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धाच्या तोंडावर बुक्की मारून दोन दात पाडले. तर मुलगा व सुनेस लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना डोका (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
डोका येथील बंकट माधव चौरे (वय ७५) हे १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता शेतात गवत काढीत असताना विश्वनाथ चौरे, प्रमोद चौरे, उषाबाई चौरे, अंजली चौरे हे चौघे आले. त्यांनी जमीन आमची असून तुम्ही गवत काढू नका म्हणाले. त्यावर कोर्टातून वाटणी झाल्याचे म्हणताच विश्वनाथ व प्रमोद या दोघांनी बंकट चौरे यांच्या तोंडावर बुक्या मारून त्यांचे दोन दात पाडले. लाथाबुक्याने मारहाण केली. तर त्यांची सून आशाबाई हिस उषाबाई व अंजली या दोघींनी केसाला धरून खाली पाडून लाथाबुक्याने व चापटाने मारहाण केली. तर त्यांचा मुलगा मधुकर हा भांडण सोडविण्यास आला असता त्यास विश्वनाथ व प्रमोद या दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने व चापटाने मारहाण केली. त्यांना यापुढे गवत काढण्यास व पेरण्यास आल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी ही दिली. याप्रकरणी विश्वनाथ चौरे, प्रमोद चौरे, उषाबाई चौरे, अंजली चौरे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts