Breaking

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावरील महाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: नोव्हेंबर 14, 2025

By Vivek Sindhu

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावरील महाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सलग तेरा वर्षापासून मधुमेह तज्ञ डॉ. अतुल शिंदे यांचा उपक्रम

अंबाजोगाई – समाजात वाढणारा मधुमेह रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवत मधुमेहाची मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे मधुमेह तज्ञ डॉ. अतुल शिंदे यांनी सतराशे रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले या उपक्रमाचे त्यांचे तेरावे वर्ष आहे शुक्रवारी अंबाजोगाई येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, आय एम ए, एम्पा व योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटर, प्रशांत नगर,अंबाजोगाई यांच्या वतीने मधुमेहावरील महा शिबिर व मोफत तपासण्या व मोफत औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अतुल शिंदे यांनी मधुमेह होऊ नये यासाठी पंचसूत्री सांगितली त्यासोबतच मधुमेहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आहाराचे व व्यायामाचे महत्त्व नमूद केले तसेच भारतातील वाढलेला मधुमेह रोखण्यासाठी जनजागृती चे महत्व सांगितले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नवनाथ घुगे, डॉ. श्रीनिवास रेड्डी,डॉ. राजेश इंगोले, डॉ. राहुल धाकडे, डॉ. उद्धव शिंदे, डॉ.सुलभा पाटील, डॉ. स्वाती शिंदे, प्रा.रोहिणी पाठक, मंजुषा जोशी उपस्थित होत्या.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वल करून धन्वंतरीचे पूजन करण्यात आले .
यंदाचा ” डायबेटिक पेशंट ऑफ दि इयर पुरस्कार ” सुरेश मस्के यांना देऊन गौरविण्यात आले .
याप्रसंगी डॉ नवनाथ घुगे, डॉ . राजेश इंगोले , डॉ .श्रीनिवास रेड्डी, डॉ सुलभा पाटील यांची भाषणे झाली.
वैद्यकीय प्रतिनिधी निलेश सूर्यवंशी, अविनाश धायगुडे, उमेश देशमुख , रणजीत मंगे,विनोद स्वामी , अजित स्वामी ,माधवी सरवदे ,सारिका जाधव यांचाही सत्कार करण्यात आला .

सुरुवातीला प्रा . रोहिणी पाठक यांनी प्रास्ताविक केले  . पाहुण्यांचे स्वागत डॉ . स्वाती शिंदे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार निर्मळे यांनी केले . शेवटी मंजुषा जोशी यांनी सर्वांचे आभार मानले .

Categories

Recent Posts