Breaking
Updated: नोव्हेंबर 13, 2025
खा. बजरंग सोनवणेंनी चिंचोलीमाळी येथील विद्युत डीपीचा प्रश्न सोडविला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – चिंचोलीमाळी (ता. केज) येथील नागबेट भागातील विद्युत डीपी मागील वर्षभरात १४ वेळा जळाल्याने विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. शेवटी खासदार बजरंग सोनवणे यांनी नवीन डीपी उपलब्ध करून देत विजेचा प्रश्न सोडविला आहे. तर डीपी बसविल्यानंतर बुधवारी रात्री खा. सोनवणे यांनी उदघाटन केले.
चिंचोलीमाळी येथील नागबेट भागात अनेक कुटुंब वास्तव्यास असून या भागातील विद्युत डीपी वर्षभरापासून सतत १४ वेळा जळाल्याने या भागातील विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. सतत विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जळालेला डीपी बदलून नवीन डीपी बसविण्याची मागणी या भागातील नागरिकांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे केली. त्यानंतर खा. सोनवणे यांनी विद्युत महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन विद्युत डीपी बसविण्याच्या सूचना दिल्या. अवघ्या पाच दिवसात नवीन डीपी उपलब्ध करून बसविण्यात आला. शिवाय जुन्या डीपीची दुरुस्त करून सर्व साहित्य नवीन बसविण्यात आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन डीपीचा प्रश्न सोडविल्याने या भागातील नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. बुधवारी रात्री खा. सोनवणे यांनी नवीन बसविलेल्या डीपीचे उदघाटन केले. यावेळी नागरिकांनी त्यांचा सत्कार करीत आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.