Breaking

एकाच रात्री दोन घरे फोडली ; दीड लाखाचा ऐवज लंपास

Updated: नोव्हेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

एकाच रात्री दोन घरे फोडली ; दीड लाखाचा ऐवज लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरे फोडून नगदी १ लाख २५ हजार रुपये व १५ हजार सहाशे रुपयांचे दागिने असा १ लाख ४० हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सारूळ (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सारूळ येथील रविंद्र नारायण ढाकणे हे नवीन घरी झोपले होते. तर त्यांच्या जुन्या घराच्या एका रूमला कुलूप लावून दुसऱ्या रूममध्ये त्यांचे आई वडील झोपले होते. ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आईवडील व भाऊ झोपलेल्या रुमला बाहेरून काड्या लावून एका रुमचे कुलूप तोडून रूममध्ये प्रवेश केला. रूमची झडती घेऊन चोरट्यांनी गव्हाच्या कोठीत ठेवलेल्या ८ हजार सहाशे रुपयांच्या दोन तोळ्याच्या जुन्या सोन्याच्या गळ्यातील दोन पुतळ्या काढून घेतल्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरापासून २०० फूट अंतरावर असलेल्या वालचंद चंद्रभान ढाकणे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. वालचंद हे एका रुममध्ये आपल्या कुटुंबासह झोपले होते. तर दुसऱ्या रूमची कडी काढून आतमध्ये प्रवेश केला. या रूममध्ये आईस्क्रीम विकण्याच्या रिकाम्या डब्यात कांदा विक्रीचे आलेले १ लाख रुपये, कपाटात ठेवलेले १५ हजार रुपये, लोखंडी पेटीत ठेवलेले १० हजार रुपये, पाच हजार रुपयांची अंगठी, दोन हजार रुपयांच्या लहान बाळाच्या मनगट्या हा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. रवींद्र ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.


Categories

Recent Posts