Breaking
Updated: नोव्हेंबर 9, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसे शहरातील प्रत्येक प्रभागात उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. नागरिकांचा कल यावेळी समाजसेवेची जाण आणि लोकहिताचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवारांकडे झुकताना दिसतो. प्रभाग क्रमांक ५ हा अद्यापही अनेक नागरी सोयीसुविधांपासून वंचित असून, या प्रभागाला कार्यक्षम, सक्रिय आणि संवेदनशील नगरसेवकाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सचिन भारत देवकर हे एक सक्षम आणि सर्वमान्य पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
सचिन देवकर हे सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक न्याय, समतेचा विचार आणि प्रभागातील विकास ही त्यांची कार्यदृष्टी आहे. नागरिकांच्या अडीअडचणीत ते नेहमी धावून जातात. त्यांनी प्रभागात बहुल संख्येने असणाऱ्या वंचित, शोषित आणि गरजू घटकांच्या हक्कासाठी आंदोलने केली आहेत. त्यासोबतच सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. मागील सलग पाच वर्षापासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य आणि गणवेश वाटप, गरजू रुग्णांना मदत, वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमा अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या मागे कार्यक्षम आणि सक्रीय तरुणांचे संघटन आहे, जे प्रभागातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असते.
कोरोनाच्या संकटकाळात देवकर यांनी मानवतेचा आदर्श घालून दिला. त्यांनी जनजागृती मोहीम, लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप या माध्यमातून प्रभागातील लोकांना आधार दिला. सामाजिक संकटाच्या काळात देवकर हे नेहमीच नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. देवकर हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. अन्यायग्रस्त, वंचित आणि पिडीत घटकांच्या हक्कासाठी ते नेहमीच लढतात. नागरिकांच्या अडीअडचणीत स्वतः पुढाकार घेऊन काम करणारे देवकर हे प्रभाग ५ मधील लोकांमध्ये विश्वासार्ह नाव बनले आहे.
निवडून आल्यास देवकर यांनी प्रभागातील स्वच्छता, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि घरकुल योजना या मूलभूत सोयीसुविधांच्या बळकटीसाठी प्राधान्याने काम करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच प्रभागात मुलांसाठी उद्यान उभारणे, आरोग्य सेवा सुधारणा आणि नागरिकांसाठी खुली व्यायाम सुविधा निर्माण करण्याचाही त्यांचा मानस आहे.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीवर आधारित समाजिक कार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण, कार्यतत्परता आणि जनतेशी असलेला दुवा पाहता नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
आज अंबाजोगाईतील नागरिक नव्या विचारांचे, काम करणाऱ्या आणि प्रामाणिक नेतृत्वाचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. अशा वेळी समाजकारणातून राजकारणात येणारे सचिन देवकर हे प्रभाग ५ साठी सक्षम, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख उमेदवार ठरू शकतात. त्यांचे संघटन, कार्यक्षमता आणि विकासासाठीची दृष्टी प्रभाग ५ ला नव्या उंचीवर नेऊ शकते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा आहे.