Breaking
Updated: नोव्हेंबर 8, 2025
महिलेचा विनयभंग, पतीस मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – एका वृद्ध दाम्पत्यास घरातून बाहेर निघा म्हणत सुनेसह तिच्या आई – वडील, भावाने लाथाबुक्याने, दगडाने व काठीने मारहाण करीत जखमी केल्याची घटना येवता (ता. केज) येथे घडली.
येवता (ता. केज) येथील नवनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ७०) व त्यांची पत्नी हे दोघे गावी वास्तव्यास असून त्यांचा मुलगा महेंद्र हा पुण्याला कामानिमित्त राहतो. त्याची पत्नी सुरेखा ही गावात माहेर असल्याने दोन्हीकडे राहते. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांची सून सुरेखा गायकवाड ही येऊन त्यांना घरातून निघून जा म्हणाल्याने ते या वयात कुठे जावे म्हणाले. त्यावरून तिने शिवीगाळ करीत तिचा भाऊ राहुल सटवा काळे, वडील सटवा सोपान काळे, आई नंदुबाई सटवा काळे यांना बोलावून घेतले. सटवा याने काठीने त्यांच्या पाठीत मारले. तर राहुल याने डोक्यात दगड मारून जखमी केले. सून सुरेखा व तिची आई नंदूबाई या दोघींनी त्यांची पत्नी शांताबाई यांना शिवीगाळ व लाथाबुक्याने, चापटाने मारहाण करीत उचलून खाली आदळले. नवनाथ गायकवाड यांच्या तक्रारीवरून सून, तिचे आई, वडील, भाऊ या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार अशोक सोनवणे हे करीत आहेत.